डोंबिवली : डोंबिवलीमध्ये 'फडके रोड सिटीस्केप्स स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. रविवार १९ जानेवारी सकाळी ८ ते १० या वेळेत ‘गद्रे बंधू, फडके रोड, डोंबिवली (पूर्व)’ येथे ही स्पर्धा होणार आहे. सहभागी स्पर्धकाने चित्रकलेचे आवश्यक ते साहित्य आणि ओळखपत्र सोबत आणायचे आहे. प्रत्येक स्पर्धाकाला एकच चित्र काढायचे आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १०० रुपये असणार आहे.
स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकाला प्रथम स्पर्धकाला ९००१ रुपये, द्वितीय स्पर्धकाला ७००१ रुपये, तृतीय स्पर्धकाला ५००१ रुपये आणि उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना २००१ अशी पारितोषिके मिळणार आहेत. स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सकाळी ११ वाजता ‘श्री गणेश मंदीर संस्थान, फडके रोड, डोंबिवली(पूर्व)’ होणार आहे. अधिक माहितीसाठी मयूरेश गद्रे (९९३०९७७७४६) आणि आशिष देशपांडे (९८६७४२१८०७) यांच्याशी संपर्क साधावा.