टोरेस कंपनीचा गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा! काय आहे संपूर्ण प्रकरण?
06-Jan-2025
Total Views |
मुंबई : (Torres Company Fraud) करोडो रुपये घेऊन मुंबईतील टोरेस कंपनीचा मालक फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे सगळे पैसे घेऊन पसार झाल्याचे समजते आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना ५०० कोटींचा गंडा घालत पोबारा केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना दर आठवड्याला १० टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी देण्यात आली होती. कंपनीने अश्या स्वरुपाची अनेक आमिषं दाखवून सगळी गुंतवणूक मिळवली होती. आणि अशातच कंपनी प्रशासन सर्व शाखा बंद करुन फरार झाल्याची माहिती समोर आली.
आमिषं दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात अडकवलं
टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना दर आठवड्याला १० टक्के व्याजाने पैसे परत करण्याची हमी देण्यात आली होती. काही आठवड्यांपूर्वीच कंपनीकडून योजना जाहिर झाल्यानंतर लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. काही गुंतवणूकदारांनी हजारो तर काहींनी लाखो रुपये टोरेस कंपनीमध्ये गुंतवले. काहींना दर आठवड्याला पैसे मिळाले. ज्यामुळे लोकांचा विश्वास वाढला मात्र गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना पैसेच मिळाले नाहीत. सोमवारी अनेक गुंतवणूकदारांनी चौकशी साठी गेले असता सर्व कार्यालयं बंद होती. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शेकडो गुंतवणूकदार कार्यालयाबाहेर जमले. संतप्त गुंतवणूकदारांनी सानपाडा येथील कार्यालयात तोडफोड केली.
वर्षभरापूर्वीच टोरेस कंपनी स्थापन करण्यात आली होती. सर्वसामान्यांकडून पैसे घेऊन त्या बदल्यात ७-१० टक्के परतावा कंपनी देत होती. १० हजार गुंतवल्यास एक हिरा देण्यात येणार ,५० हजार गुंतवल्यास गाडीचे कूपन देण्याचे आश्र्वासन, १ लाखांची गुंतवणूक केल्यास घराचे कूपन देण्याचे आश्र्वासन, लकी ड्रॉ पद्धतीने नाव काढून बक्षीस देण्याचे आमिष दाखवले होते. गेल्या वर्षभरात टोरेस कंपनीने दादर , कांदिवली ,नवी मुंबई, कल्याण येथे आपल्या नवीन शाखा सुरु केल्या होत्या. कंपनीने गुंतवणूकदारांना विशेष वागणूक देत गोड बोलून जाळ्यात ओढलं आणि अडकवण्यात आले होते.