अकोल्यात आठवे शालेय पक्षीमित्र संमेलन संपन्न; विद्यार्थ्यांसमोर उलगडले पक्ष्यांचे विश्व

    06-Jan-2025
Total Views |
 student pakshimitra conference akola
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - अकोल्यामध्ये आठवे शालेय पक्षीमित्र संमेलन नुकतेच पार पडले (student pakshimitra conference akola). शालेय विद्यार्थ्यांमध्ये पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा भारतामधील एकमेव उपक्रम आहे (student pakshimitra conference akola). या संमेलनामध्ये पक्षीनिरीक्षण छंदाविषयी विविध कार्यक्रमांमधून माहिती देण्यात आली आणि मुलांसाठी स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. (student pakshimitra conference akola)
 
 
शिक्षणाधिकारी माध्य, जि.प. अकोला, निसर्गकट्टा, वन विभाग सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या शालेय पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे संमेलन अकोल्यातील लोकमान्य टिळक सभागृहात नुकतेच पार पडले. या संमेलनात राजेश्वर कॉन्व्हेंट, जिजाऊ कन्या विद्यालय, न्यु इंग्लिश हायस्कूल, जि.डी. प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल, सन्मित्र पब्लिक स्कूल, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय इ. शाळेतील 'निसर्गकट्टा इको क्लब'च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या संमेलनात बुलढाणा येथील बाल पक्षीमित्र क्षितीज गजेंद्र निकम याने माझे पक्षीनिरीक्षण, जळगाव येथील युवा पक्षीमित्र सौरभ महाजन यांनी पक्षीनिरीक्षण एक छंद आणि शिवाजी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या सह.प्राध्यापिका डॉ. विजयश्री हेमके यांनी पक्ष्यांवरील विविध माहितीवर स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, पक्षी कट-आऊट स्पर्धा आणि प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'निसर्गकट्टा'चे अमोल सावंत आणि आभार प्रदर्शन डॉ. मिलिंद शिरभाते यांनी केले. संमेलन यशस्वी करण्यासाठी 'निसर्गकट्टा'चे प्रदिप किडीले, अँड. अजिम शेख, प्रेम अवचार , डॉ. हरीश मालपाणी, डॉ. संतोष सुरडकर, नागसेन आकोडे, प्रथम सिंकटवार यांना अथक परिश्रम घेतले.
 
 
 
सादरीकरण स्पर्धा
प्रथम - राशी यादव, जि.डी. प्लॅटीनम ज्युबिली हायस्कूल, अकोला
द्वितीय - ईशान राऊत, सन्मित्र पब्लीक स्कुल, अकोला
तृतीय - इच्छा घुरडे, ज्युबिली इंग्लिश हायस्कुल, कुंभारी
उत्तेजनार्थ - आदिती जगताप व समर्थ यादव
 
 
पक्षी कट-आऊट स्पर्धा
प्रथम - कृतिका गोपाल मांडेकर
द्वितीय - अर्पिता आगरकर
तृतीय - गौरी अतुल साळुंके
उत्तेजनार्थ - वेदिका निलकंठ गोलाईत
 
 
निबंध लेखन स्पर्धा
प्रथम - त्रिशा रविंद्र यादव, जि.डी. प्लॅटीनम ज्युबिली इंग्लिश स्कुल
द्वितीय - मनस्वी विजय इंगळे, जिजाऊ कन्या विद्यालय, अकोला
तृतीय - अनुष्का जुनारे, सन्मित्र पब्लिक स्कुल, अकोला
उत्तेजनार्थ - ईश्वरी मनोज फाले, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, कुंभारी, सोमेश्वर मोडक, जि.डी. प्लॅटीनम ज्युबिली इंग्लिश स्कुल
 
 
पोस्टर स्पर्धा
प्रथम - प्रणाली अनिल गुजर, राजेश्वर कॉन्व्हेंट, अकोला
द्वितीय - वेदिका निलकंठ गोलाईत, मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालय, अकोला
तृतीय क्रमांक - अक्सा परविण सालिम रेघीवाले, जिजाऊ कन्या विद्यालय, अकोला
उत्तेजनार्थ - राशी राहुल यादव, जि.डी. प्लॅटिनम ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, अकोला, दर्शना घराडे, सन्मित्र पब्लिक स्कूल.