शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा पॉवरफुल्ल टीझर प्रदर्शित

06 Jan 2025 09:58:53

shahid kapoor 
 
 
मुंबई : ‘विवाह’ असो किंवा ‘चुप चुप के’ शाहिद कपूरने विनोदी, प्रेमपट अशा विविध चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाची शैली दाखवली आहेच. नुकताच त्याचा बहुप्रतीक्षित ॲक्शनपट 'देवा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून यात तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. रोशन अँड्र्यूज या मल्याळम दिग्दर्शकाच्या देवा चित्रपटात शाहिद कपूरचा आजवर न पाहिलेला अंदाज दिसणार आहे.
 
'देवा' मधील शाहिद कपूरच्या अ‍ॅग्री यंग मॅन लूकमुळे चित्रपट नेमका काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. टीझरवरुन चित्रपटाचं कथानक एका पोलीस अधिकाऱ्याच्या भोवती फिरते असे दिसते.
 
शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट ३१ जानेवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज यांच्या या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी केली आहे. दरम्यान, ‘देवा’ चित्रपटामुळे शाहिद कपूर जवळपास वर्षभरानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत असून त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0