'इंडिया इज इंदिरा', कंगनाच्या 'इमर्जन्सी'चा नवा ट्रेलर प्रदर्शित

06 Jan 2025 10:51:05
 
kangana ranaut
 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत दिग्दर्शित आणि अभिनित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला बराच काळ मुहुर्त मिळत नव्हता. मात्र, १७ जानेवारी २०२५ रोजी अखेर हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार असून भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळाची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
 
कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. प्रदर्शित केलेल्या नव्या ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर जनतेचे झालेले हाल, राजकीय नेत्यांनी केलेला विरोध नेमका कसा होता आणि किती भयाण परिस्थिती होती याचे वास्तव दिसते.
 
कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असून यात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, महिमा चौधरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. १७ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0