नवी दिल्ली : 'द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज' या थीमसह आशियातील सर्वात मोठा एरो शो असलेल्या एरो इंडिया २०२५ - ची ( Aero India 2025 ) १५ वी आवृत्ती १० ते १४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलाहंका येथील हवाईदलाच्या तळावर होणार आहे.
मैत्रीपूर्ण देशांसोबत धोरणात्मक भागीदारीसाठी संवाद सुलभ करण्यासाठी ‘ब्रिज- अर्थात आंतरराष्ट्रीय संरक्षण आणि जागतिक सहभागातून लवचिकता निर्माण करणे’ या थीमवर संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे विकासाची सामायिक दृष्टी असलेल्या राष्ट्रांमधील सहकार्याद्वारे अधिक दृढ होईल. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री, रक्षा राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सचिव यांच्या स्तरावर अनेक द्विपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नवीन मार्ग शोधून मित्र देशांसोबत संरक्षण आणि एरोस्पेस संबंध मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
विविध उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेद्वारे मूळ विदेशी उपकरण उत्पादकांना भारतात उत्पादनासाठी अनुकूल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे. जागतिक सीईओ, सरकारी उद्योगांचे संचालक भारतातील प्रमुख खाजगी संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादक कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. इंडिया पॅव्हेलियन आपल्या मेक-इन-इंडिया उपक्रमाप्रती भारताची बांधिलकी दाखवून स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, भविष्यातील संभाव्यतेसह जागतिक स्तरावर तयार आहे.