स्वत:च्या अपयशासाठी शेजाऱ्यांना दोष देणे ही पाकची प्रथा - भारताने झापले

    06-Jan-2025
Total Views |
Randhir Jaiswal

नवी दिल्ली : महिला आणि मुलांसह अफगाण नागरिकांवर पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून भारताने ( India ) हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पाकिस्तानच्या अंतर्गत अपयशांसाठी शेजाऱ्यांवर दोष ढकलण्याच्या दीर्घकाळ चाललेल्या प्रथेवर टीका केली. ते म्हणाले, भारताने महिला आणि मुलांसह अफगाण नागरिकांवर झालेल्या हवाई हल्ल्यांवरील वृत्तांची नोंद घेतली आहे. या हल्ल्यामध्ये अनेकांनी जीव गमावले आहेत.

जयस्वाल पुढे म्हणाले, भारत निष्पाप नागरिकांवरील कोणत्याही हल्ल्याचा निःसंदिग्धपणे निषेध करतो. स्वतःच्या अंतर्गत अपयशासाठी शेजाऱ्यांना दोष देणे ही पाकिस्तानची जुनी प्रथा आहे. भारताने या संदर्भात अफगाण प्रवक्त्याची प्रतिक्रिया देखील लक्षात घेतली असल्याचेही जयस्वाल यांनी यावेळी नमूद केले आहे.