कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो राजीनामा देण्याच्या तयारीत!

06 Jan 2025 12:01:03

liberal

ओटावा : आपल्या कार्यकाळात असंख्य आव्हानांना तोंड देत कॅनडा सारख्या देशाचा गाडा सांभाळणारे जस्टिन ट्रूडो आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. अकार्यक्षम नेतृत्व, लोकाभिमुख धोरण राबवताना आलेलं अपयश, आर्थीक आघाडीवर आलेला पराभव अशा असंख्य गोष्टींमुळे ट्रूडो यांची पक्षांतर्गत नाचक्की झाली होती. भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध सुद्धा ट्रुडो यांच्या कार्यकाळात बिघडले आहे. कॅनडामध्ये कट्टरपंथीय खलिस्तान्यांचा जाच दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांच्या राजीनाम्याची मागणी, त्यांच्याच आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी केली. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राजीनामा देणार आहेत.

ट्रुडो यांच्या राजीनाम्यामुळे कॅनडामध्ये राजकारणाचे बिगुल वाजणार असून नेतृत्वासाठी पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रूडो हे कॅनडाचे अर्थमंत्री डोमिनिक लेब्लँक यांच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा सांभाळायला देण्याचा विचारात आहे. दुसऱ्या बाजूला कॅनडाच्या गृहमंत्रालयाचे शॉन फ्रेझर, परराष्ट्र व्यवहार मंत्री मेलानी जोली, परिवहन मंत्री अनिता आनंद अशी काही प्रमुख नावं पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहेत. ट्रुडो यांच्या लोकप्रियेतमध्ये झालेली घट बघता, ते त्यांच्या राजकीय कारर्कीदीचे आत्मपरिक्षण करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

Powered By Sangraha 9.0