मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याने आजवर विनोदी, प्रेमपट, अॅक्शन, हॉरर-कॉमेडी अशा विविध विषयांवर आधारित चित्रपटांत कामं केली आहेत. अलीकडेच सिंघम अगेन, 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'सरफिरा, 'खेल खेल में' अशा चित्रपटांत तो झळकला होता. याशिवाय, मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिवर्समधील स्त्री २ चित्रपटात तो विशेष भूमिकेत झळकल्यामुळे त्याचा कॅमिओ प्रेक्षकांना विशेष भावला होता. स्त्री ३ मध्ये अक्षय कुमार दिसणार का अशा चर्चा सुरु झाल्या असताना दिग्दर्शक दिनेश विजान यांनी अक्षय कुमारचा उल्लेख हॉरर-कॉमेडी युनिव्हर्सचा 'थानोस' असा केला आहे.
२०२४ या वर्षात स्त्री २ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. ८०० कोटींहून अधिक कमाई करून हा चित्रपट आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अक्षयने सरकटाच्या वंशजाची भूमिका साकारली होती. अलिकडेच मॅडॉक फिल्म्सने आगामी ८ नवीन चित्रपटांची घोषणा केली आणि त्यात 'स्त्री ३'ऑगस्ट २०२८ मध्ये प्रदर्शित होईल असेही जाहिर केले. नुकताच अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न झाला. यावेळी अक्षय कुमारने दिनेश विजानसोबतचा त्याचा 'दीड' चित्रपट असे वर्णन केले. जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो या हॉरर-कॉमेडी विश्वाचा एक भाग बनणार का? तर तो म्हणाला की, ' मी काय बोलू?' हे निर्माते दिनेश विजान आणि ज्योती देशपांडे ठरवतील. ते पैसे गुंतवणार असून अमर कौशिक यांना दिग्दर्शन करायचे आहे. अक्षयचे बोलणे संपल्यावर दिनेशने त्याला दुजोरा देत म्हटले की, 'नक्कीच, तो या विश्वाचा एक भाग आहे! तो आमचा थानोस आहे'.
दरम्यान, 'स्त्री २'मध्ये अक्षयने मानसिक आजारी असलेल्या रुग्णाची भूमिका साकारली होती. चित्रपटात, त्याचे वर्णन सरकटाच्या कुळातील शेवटचे सदस्य म्हणून केले गेले होते, ज्याच्याकडे त्याचा नाश करण्याची चावी आहे. त्यामुळे आता स्त्री ३ मध्ये काय होणार? नेमकी अक्षय कोण आहे याचं उत्तर येत्या काळात नक्कीचसमोर येईल.