मुंबई : महाराष्ट्रातील कोट्यवधी मतदारांना कुणी वेश्या म्हणत असेल तर एकनाथ शिंदेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावर राऊतांनी सोमवारी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, "जर कुणी मतदारांना वेश्या म्हणत असेल, लोकशाहीला रखेल म्हणत असेल आणि संविधानाला कुणी गुलाम मानत असेल तर मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे. मतदारांना अशा प्रकारे बोलणे या सगळ्या प्रकारावर विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यपालांनी मत व्यक्त करायला हवे."
हे वाचलंत का? - मनोज जरांगेंवर तीन ठिकाणी गुन्हा दाखल!
"महाराष्ट्रातील कोट्यवधी मतदारांना जर कुणी वेश्या म्हणत असेल तर त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. तुम्हाला मतदार वेश्या वाटतात का? त्यांचे मत तुम्ही पैसे देऊन घेतले असतील. मी तुमचा गुलाम आहे का? सालगडी आहे का, असे अजितदादा पवार म्हणतात. तुम्हाला हे कसले फ्रस्टेशन आले आहे, हे राज्याला समजू द्या," असेही संजय राऊत म्हणाले.