सावरकरांनंतर साहित्य संमेलनात दाभोळकरांच्या नावाची मागणी

    06-Jan-2025
Total Views |

dabholkar

दिल्ली :
२१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय साहित्य महामंडळ आणि आयोजक सरहद संस्थेने नुकत्याच झालेलय बैठकित घेतला. या निर्णयानंतर आता विज्ञान भवनातील उद्घाटनीय स्थळाला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांना पाठवले आहे.
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पत्रानुसार, साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात होणार आहे, त्याला दाभोळकरांचे नाव देण्यात यावे.