१९८५ सालच्या कुंभमेळ्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
06-Jan-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील कौशांबी लोकसभेत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जवाहरलाल नेहरुंचा हवाला देत काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी १९५४ सालच्या कुंभमेळ्याचा संदर्भ दिला आहे. चेंगराचेंगरीमध्ये हजारो लोक मारले गेले पण नेहरूंची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपवण्यात आले आहे. २०१९ सालच्या कुंभमेळ्याची तुलना करत सध्याच्या कुंभमेळ्याची व्यवस्था सुव्यवस्थित राहिली असल्याचे ते कौशांबीमध्ये म्हणाले होते.
पुढे ते म्हणाले की, एकदा पंडित नेहरू हे कुंभमेळ्यात आले होते. त्यावेळी प्रचंड गर्दी वाढली आणि त्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली होती. हजारो लोक मारले गेले होते. सरकारची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि नेहरूंवर याप्रकरणी कोणीही आरोप करू नये म्हणून प्रसारमाध्यमाने हे सत्य दाखवण्याचे धाडस केले नाही. बातमी जरी प्रसारीत झाली तरी कुठेतरी एखाद दुसऱ्यांदा ती बातमी दाखवली जात होती.
१९५४ साली केंद्र आणि उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे तत्कालीन देशाचे पंतप्रधान होते. तर गोविंद वल्लभ पंत हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मौनी अमास्येदरम्यान देशाचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू हे गंगेत स्नान करण्यासाठी आले होते. यावेळी कुंभमेळ्यात गर्दी वाढली आणि हे प्रकरण दडपवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाला.
एका मासिकासाठी कुंभमेळ्याच्या कव्हरेजसाठी आलेल्या एनएन मुखर्जी नावाच्या पत्रकाराने १९८९ साली काही छायाचित्रे मासिकात प्रकाशित करण्यात आले होते. यामागची पार्श्वभूमी त्यांनी मासिकामध्ये सांगितली होती. किंबहुना या मेळाव्यात झालेल्या अपघातांची भीषणता या छायाचित्रामुळे समोर आली. यामुळे एनएन मुखर्जी या पत्रकारावर काँग्रेस सरकार तत्कालीन परिस्थितीत दात खावून होते.