समाजाची व पर्यावरणाची सेवा हीच भारत मातेची खरी पूजा : सरसंघचालक

    06-Jan-2025
Total Views |

Sarsanghachalak at Onkareshwar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kutumb Prabodhan Akhil Bhartiya Baithak)
"भारतातील समाजाची व पर्यावरणाची सेवा हीच भारतमातेची खरी पूजा आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. मालवा प्रांतच्या ओंकारेश्वर येथे कुटुंब प्रबोधन गतिविधीची अखिल भारतीय बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीचा समारोपामध्ये नर्मदेच्या तीरावर असलेल्या मार्कंडेय आश्रमात सरसंघचालकांनी भारतमाता व शंकराचार्यंची पूजा केली.

हे वाचलंत का? : तैमूर-औरंगजेबला जन्म देणाऱ्या माता आदर्श होऊ शकत नाही! : साध्वी ऋतंभरा

भारतमाता पूजेचे महत्त्व आणि उद्देश स्पष्ट करताना सरसंघचालक जी म्हणाले की, भारताची भूमी आपले पालनपोषण करते, संरक्षण करते आणि समृद्ध बनवते. भारतात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सेवेची नैसर्गिक संस्कृती असते. भारत मातेची पूजा करणे म्हणजे भारतात राहणारे लोक, जमीन, जंगल, पाणी आणि प्राणी यांची सेवा आणि संरक्षण करणे. पर्यावरण आणि जैवविविधतेचे संवर्धन हे भारतमातेच्या उपासनेतून आपल्याला प्रेरणा मिळते."

गृहस्थ आश्रम हे धर्माचे केंद्र असल्याचे सांगून ते म्हणाले की, "कोणतीही परिस्थिती असो समाजसेवेसाठी प्रत्येकाने तत्पर असले पाहिजे. ज्याप्रमाणे मातेची सेवा करून देवाचे वाहन बनण्याचे वरदान गरुडाला मिळाले, त्याचप्रमाणे आपल्यालाही भारतमातेची सेवा करून धर्माचे वाहक बनता आले पाहिजे पाहिजे." कौटुंबिक प्रबोधन गतिविधीच्या अखिल भारतीय बैठकीत समर्थ कुटुंब पद्धतीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

कुटूंब प्रबोधन गतिवधीद्वारे कुटुंबाला बळकट ठेवण्यासाठी सहा प्रकारच्या 'भ' वर काम करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला भोजन, भजन, भाषा, भूषा, भ्रमण आणि भवन, या सर्व गोष्टींवर काम करावे लागेल असे सांगण्यात आले. त्याचबरोबर सध्या लहान मुलांमध्ये दिसणाऱ्या विकृतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर. यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबात परस्पर संवाद वाढवणे आवश्यक आहे, जेणेकरून घरातील मुले आपल्या मनातले बोलू शकतील आणि कौटुंबिक वातावरणात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील. असेही सरसंघचालक पुढे म्हणाले.