कोकण : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, कोकण प्रांत तर्फे कोकण विभागात राहणार्या लेखकांसाठी ‘मराठी व हिंदी कथा स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील कुटुंब व्यवस्थेचे महत्व अधोरेखीत करणारी ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा गट १ (९ वी ते १२ वी चे विद्यार्थी, गट २ (१३ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे महाविद्यालयीन विद्यार्थी), गट ३ (वय वर्षे ४० पर्यंतच्या लेखकांसाठी), गट ४ (४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लेखकांसाठी) अशा ४ गटांमध्ये होणार आहे.
कथेचा मुख्य उद्देश कुटुंबाच्या महत्त्वावर केंद्रित असावा, ज्यामध्ये कुटुंबाची परंपरा आणि कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जावे, कथा २००० शब्दांपेक्षा जास्त नसावी, कथा लघुकथा नसावी आणि एका स्पर्धकाला फक्त एकच कथा पाठवता येईल असे या स्पर्धेचे निकष आहेत. कथा
[email protected] ई मेल वर युनीकोडमध्ये दिनांक ३१ जानेवारी २०२५ मध्यरात्रीपर्यंत पाठवायची आहे. कथे सोबत आपले नाव पत्ता, संपर्क क्रमांक, मेल आयडी, तसेच कथा आपलीच असल्याचे नमूद करावे. प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन कथा निवडल्या जातील आणि त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात येईल. अधिक माहितीसाठी श्री संजय द्विवेदी, मंत्री (9833550069), डॉ. शामसुंदर पाण्डेय,कल्याण (9820114571) यांच्याशी संपर्क साधावा.