कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी पन्नूची ई-मेलच्या माध्यमातून दर्पोक्ती
06-Jan-2025
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे नुकत्याच झालेल्या एका चकमकीमध्ये तीन खलिस्तानी दहशदवाद्यांना ठार मारल्यानंतर खलिस्तानी गुरपवत सिंह पन्नू यांनी पुन्हा एकदा धमकावले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा २०२५ बाबत त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून कुंभमेळ्यात १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान लखनऊ विमानतळावर येण्याचे आवाहन करणारा ई-मेल केला आहे.
पन्नूनने या मोहिमेस महाकुंभ महायुद्ध असे नाव दिले आहे. सोमवारी, गुरपवंत सिंह पन्नून यांच्या नावाने असंख्य लोकांना ई-मेल जात आहेत. लखनऊ आणि प्रयागराज विमानतळावर असंख्य खलिस्तानी समर्थकांनी पोहोचावे असे त्या ई-मेलमध्ये मजकूर लिहिण्यात आल्याचे प्रसारमाध्यमानुसार सांगण्यात येत आहे. खलिस्तान आणि काश्मीरचा झेंडा फडकवला जावा. ना हिंदुत्व ना हिंदुस्थान, महाकुंभ प्रयागराज एकाअर्थी युद्धाचे रणांगण आहे, असे त्यांनी ई-मेलमध्ये नमून केले होते.
Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun threatens to disrupt Mahakumbh 2025 in Prayagraj, urging chaos
डिसेंबर २०२४ मध्ये पंजाब पोलिसांच्या इनपुटवर उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने पीलीभीतमध्ये चकमकीमध्ये तीन खलिस्तानी वीरेंद्र सिंह, गुरविंदर सिंह आणि जसनप्रीत सिंह यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस प्रमुख गुरपवंत सिंह पन्नू यांनी महाकुंभच्या तीनही शाही स्नान उत्सवामध्ये दहशतवादी कारवाया करण्याच्या धमक्या दिल्या आहेत.