पत्रकार मुकेश चंद्राकरची हत्या करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    06-Jan-2025
Total Views |

Journalist Mukesh Chandrakar Murdered
 
चंदीगड : छत्तीसगड राज्यातील पत्रकार मुकेश चंद्राकरची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव हे सुरेश चंद्राकर आहे. पोलिसांनी एक विशेष पथक तयार करत आरोपी सुरेशला हैदराबाद येथून अटक केली आहे. याप्रकरणाची माहिती स्वतः आयजी पी सुंदरराज यांनी दिली आहे.
 
पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. ३ जानेवारी रोजी पोलिसांनी त्याचा मृतदेह कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्या घरातील सेप्टीक टँकमधून बाहेर काढला होता. मुकेशच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या करण्यात आली. मृतदेह सापडल्यानंतर सुरेशचा शोध घेण्यात आला असता घटनेनंतर तो घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अखेर याप्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
 
दरम्यान, आरोपी हा काँग्रेस नेता आणि कंत्राटदार असून त्यांच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर चालवत कायदेशीर कारवाई केली आहे. याप्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू असून आरोपीची तीन बँक खाती गोठवली गेली आहेत.