नवी मुंबई : खारघर, नवी मुंबई येथील इस्कॉन मंदिराचे बुधवार १५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि महालोकार्पण होणार आहे. उद्घाटनापूर्वी आठवडाभर विविध विधी पार पडणार आहेत. या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासह विविध धार्मिक उपक्रमांचा समावेश असेल आणि त्याची सांगता १५ तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाने होईल.