सोनू असे नाव सांगत महमूद खानने हिंदू युवतीवर धर्मांतरणाची केली जबरदस्ती
06-Jan-2025
Total Views |
लखनऊ : आम आदमी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष कट्टरपंथी महमूद खान यांना लव्ह जिहादप्रकरणात (Love Jihad) अटक करण्यात आली आहे. जयसिंगपूर कोतवाली भागातील एका हिंदू तरुणीने महमूद खानवर बलात्कार, धर्मांतरणासाठी दबाव आणत ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. एवढेच नाहीतर आपण सोनू असल्याचे सांगत महमूद खानने युवतीशी मैत्री करत तिला विश्वासात घेत तिचे लैंगिक शोषण केल्याचा दावा पीडितेने केला आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार पीडितेने सांगितले की, सुमारे १५ महिन्यांपूर्वी महमूद खानने तिचे नाव सोनू असल्याचे सांगत तिच्याशी मैत्री केली. २० ऑगस्ट रोजी ती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोपीला भेटण्यासाठी आली. त्याठिकाणाहून पीडितेला तिथून शहरातील एका खोलीमध्ये नेण्यात आले. त्यावेळी कट्टरपंथी महमूदने बलात्कार करत पीडितेचा व्हिडिओ बनवत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असून पीडितेला धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला.
ब्रेकिंग सुल्तानपुर
आम आदमी पार्टी के पूर्व जिलाध्यक्ष महमूब खान पर बड़ा आरोप
संगठन से जुड़ी महिला के साथ बनाया संबंध, अब जबरन मुस्लिम धर्म परिवर्तन करने का बना रहा दबाव
पीड़ित महिला की शिकायत पर पुलिस ने दर्ज किया मुकदमा
युवतीने घडलल्या घटनेची माहिती पोलिसांनी दिली असून मेहमूदने पीडितेला जबरदस्त मांस खाण्यास भाग पाडले. तसेच इतर काही लोकांना बोलावून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या खोलीत बंदिस्त असताना पीडितेचा छळ करण्यात आला. एकूण परिस्थिती पाहत तिने घटनास्थळावरून पळ काढला.
याचपार्श्वभूमीवर रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी आरोपीने मुलीला पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. त्याने नकार दिल्याने त्यांनी त्याला बेदम मारहाण केली आणि चहामध्ये अंमली पदार्थाचे मिश्रण केले होते. पीडितेच्या तक्रारीवरून कोतवालीनगर पोलिसांनी महमूद खानला ताब्यात घेतले आहे. प्रभारी निरीक्षक नारदमुनी सिंह यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि धर्म परिवर्तन याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.