बांगलादेशी हिंदू महिलेला ४० वर्षांच्या संघर्षानंतर CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व
06-Jan-2025
Total Views |
पटना : बांगलादेशातील सुमित्रा प्रसाद नावाच्या एका हिंदू महिलेला बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील भारतीय नागरिकत्व देण्यात आले. गेल्या ४० वर्षांपासून हिंदू महिला भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात होती. आतापर्यंत व्हिसाच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या सुमित्रा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे म्हणजेच CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवले आहे. बांगलादेशातील इस्लामिक अतिरेक्यांकडून हिंदूंचा छळ होत असल्याची माहिती सुमित्रा यांनी दिली आहे.
घटनेच्या अहवालामध्ये असे म्हटले की, वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी सुमित्रा प्रसाद यांनी आपल्या वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे बांगलादेशात त्यांच्या मावशीकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील मदन गोपाल त्यांची पत्नी, २ मुली आणि २ मुलांच्या खर्चाचा बार पेलत नव्हता. सुमित्राची मावशी बांगलादेशाच्या राजशाही जिल्ह्यामध्ये राहत होती. १९७१ मध्ये पाकिस्तानची फाळणी झाली त्यानंतर अराजकचा माजली आहे. दरम्यान, सुमित्रा यांनी बांगलादेशातच वास्तव्य केले.
पुढे सुमित्रा म्हणाल्या की, बांगलादेशातील हिंदूंना समभावाने पाहिले जात नाही. बांगलादेशी इस्लामिक अतिरेक्यांच्या रोजच्या छळामुळे सुमित्रा या १९८५ मध्ये भारतात परतल्या. त्यानंतर सुमित्रा बांगलादेशात पुन्हा गेल्याच नाहीत. सुमित्रा भारतात आल्या तेव्हा त्या २० वर्षांच्या होत्या. त्या पुन्हा भारतात परतल्यानंतर त्यांचा बिहारमधील भोजपूर येथे विवाह झाला. सुमित्रा या घरकामासह उदरनिर्वाहासाठी किराणा मालाचे दुकान चालवत. सुमित्रा आणि त्यांच्या पतीस ३ मुली आहेत.
दरम्यान, सुमित्रा यांच्या पतीचे २०१० मध्ये निधन झाले. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्या दरवर्षी व्हिसासाठी कार्यालयात जात असत. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांना पुन्हा बांगलादेशात जाण्याचा सल्ला दिला. व्हिसासाठी उशीर झाल्याने पोलिसांनी २०२३ या वर्षामध्येही हाच सल्ला दिला होता.
अखेर सुमित्रा यांची मुलगी ऐश्वर्या हिला नागरिकत्व CAA बद्दल माहिती मिळाली. ऐश्वर्याने या कायद्याअंतर्गत तिच्या आईसाठी अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर अवघ्या ३ महिन्यात सुमित्रा यांना भारतीय नागरिकत्व मिळाले. आता भारतीय नागरिक झाल्यानंतर सुमित्रा यांचे कुटुंब खूप आनंदी आहे.