मुंबई : मौल्यवान ऐतिहासिक नोंदींचे डिजिटायझेशन करून आपल्या देशाचा इतिहास आणि संस्कृती जतन करण्यासाठी उचलले गेलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे आपले ‘अभिलेख पटल’ पोर्टल https://www.abhilekh-patal.in/jspui/ (Abhilekh Patal Portal). हे पोर्टल म्हणज भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार (NAI) ने विचारपूर्वक तयार केलेले डिजिटल भांडारच आहे. या पोर्टलवर भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक दस्ताऐवज डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत. सध्या या पोर्टलवर १२९२००२ हून अधिक दस्ताऐवज उपलब्ध आहेत. हे पोर्टल म्हणजे इतिहास अभ्यासकांसाठी ज्ञानाचा खजिनाच आहे. या ‘अभिलेख पटल’ मुळे जगभरातून कोठूनही भारतीय इतिहासाशी संबंधित कागदपत्रे आपल्याला सहज एका क्लीकवर उपलब्ध होतात.
'अभिलेख' या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो प्राचीन काळातील नोंदी दर्शविणारा आणि ‘पटल’ म्हणजे पृष्ठभाग. तसेच पटल हा शब्द पोर्टल फॉर ऍक्सेस टू आर्काइव्ह्ज अँड लर्निंग' (Portal for Access to Archives & Learning'.) चे संक्षिप्त रूप आहे.