क्वालालंपूर : घुसखोरी करणाऱ्या रोहिंग्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच, ४ जानेवारी रोजी मलेशिया मध्ये घुसखोरी करणाऱ्या ३०० रोहिंग्या मुस्लीमांना मलेशियाच्या सरकारने पिटाळून लावले. २ बोटींमध्ये प्रवास करत मलेशियाच्या सागरी सीमेत प्रवेश करणाऱ्या रोहिंग्यांना मलेशिया सरकारने वेळीच रोखले. बोटीवरील लोकांकडे आवश्यक साहित्य नव्हते. त्यामुळे मलेशियन अधिकाऱ्यांनी बोटी वळवण्यापूर्वी अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
३ जानेवारी रोजी मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी १९६ घुसखोर रोहिंग्यांना ताब्यात घेतले होते. या प्रसंगाच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. रोहिंग्या घुसखोर हे नेमके कुठल्या राज्यातून प्रवेश करीत आहेत याचा अद्याप पुरावा सापडलेला नाही. परंतु बांगलादेश मधून हे घुसखोर येत असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे. म्यानमरमध्ये झालेल्या यादवी युद्घामुळे लाखो रोहिंग्यांनी आपला देश सोडून पळून गेले. मुस्लीम बहुल देश असलेल्या मलेशियाने रोहिंग्यांचा स्विकार काही काळापूर्वी पर्यंत केला होता. मात्र, स्थलांतरीत होणाऱ्यांची वाढलेली संख्या बघता, त्यांनी यावर प्रतिबंध लावला. आजमितीला मलेशियामध्ये ५८ टक्के निर्वासीत राहत असतात.