बेंगळुरू : बेंगळुरू येथील अतुल सुभाष यांनी केलेली आत्महत्या काही दिवसांपूर्वी पूर्ण देशात चर्चेचा विषय बनली होती. तब्बल दीड तासांच्या व्हिडीओमध्ये आपल्या आत्महत्येमागचं संपूर्ण स्पष्टीकरण अतुल यांनी दिली. घटस्फोट आणि पोटगीच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले होते. या प्रकरणात सुभाष यांची बायको निकीता सिंघानिया हीला गुरूग्राम मधून अटक करण्यात आली होती. त्याच बरोबर निकीताची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुरग सिंघानिया यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. अतुल सुभाष यास आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
अतुल सुभाष यांचे वकीलपत्र घेतलेल्या विनय सिंह माध्यमांना माहिती देताना म्हणाले की निकीता सिंघानिया यांना दिलेल्या जामीनीला ते आव्हान देणार आहेत. अतुल सुभाषची सुसाईड नोट, जी त्याच्याशी संबंधित असलेल्या एनजीओच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देखील शेअर केली गेली होती त्या द्वारे असे लक्ष्यात येते की २०१९ मध्ये लग्न झाल्यापासून वैवाहिक कलहाचा त्याला सामना करावा लागला होता.