लखनऊ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरवण्याची तारीख निश्चित झाली. त्याआधीच एका आठवड्यापूर्वी एका मौलवीने हा कार्यक्रम वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीवर आयोजित केल्याचा दावा केला. यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. अखिल भारतीय मुस्लिम जमातीच्या वतीने मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेवली याने दावा केला की, संबधित जमीन ही कुंभ मेळ्यासाठी वापरली जात आहे.
मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी म्हणाले की, प्रयागराज येथील मुस्लिम समुदायातील लोकांनी वक्फ भूमीवर कुंभ मेळाव्याला परवानगी दिली हे आमचे मोठे मन आहे. हिंदूंनी या कार्यक्रमामध्ये प्रवेश देऊन प्रतिसाद दिला पाहिजे, असे म्हणत त्यांनी गरळ ओकली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ते म्हणाले की, आखाडा परिषद, नागा संन्यासी, स्वामी आणि बाबा यांनी कुंभमेळाव्यात मुस्लिमांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली. दुसरीकडे, प्रयोगराजमधील सरताज नावाच्या एका कट्टरपंथी व्यक्तीने कुंभमेळ्याची तयारी सुरू असलेल्या ठिकाणची जमीन ही वक्फ बोर्डाची असल्याचे म्हटले आहे.
यावर इस्लाम धर्मगुरुंनी केलेले दावे फेटाळून लावण्याचे काम हिंदू नेत्यांनी केले आहे. संबंधित कुंभमेळ्याचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज म्हणाले की, वातावरण बिघडवणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करावी. त्यांच्यावर एफआरआय दाखल नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, असे लोक बाहेर पडले तर ते निरर्थक वक्तव्य करत राहणार आणि देशात धार्मिक तणाव निर्माण करत वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत, असे चक्रपाणी महाराज म्हणाले आहेत.