शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांना पत्नीशोक

वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    05-Jan-2025
Total Views |
 
Meghna Kirtikar passes away
 
मुंबई : शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानान कीर्तिकर  यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तीकर यांचे दीर्घ आजाराने निधन (Meghna Kirtikar passes away) झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता मेघना गजानन कीर्तीकर यांची प्राणज्योत मालवली. वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
मेघना कीर्तिकर यांच्या जाण्याने कीर्तीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मेघना कीर्तीकर यांच्यावर गोरेगाव पूर्व भागातील स्नेहदीप, पहाडी रोड नं. २ शिवधाम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या पाश्चात गजानन कीर्तीकर, मुलगा अमोल कीर्तीकर, सून आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.