लव्ह जिहाद! फेक अधारकार्डचा वापर करत हॉटेलमध्ये बुक केली खोली, हिंदू संघटनेचे लोक घटनास्थळी दाखल झाले अन् बिंग फुटले

    05-Jan-2025
Total Views |
 
Love Jihad
 
भोपाळ : उज्जैनमध्ये लव्ह जिहादच्या कथित प्रकरणामध्ये हिंदू संघटनांनी एका कट्टरपंथी तरुणाला पोलिसांच्या हवाली केले. एका रिक्षाचालकाने बनावट आधारकार्ड देत युवकाने त्याचा गैरवापर केला आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
याप्रकरणामध्ये सीएसपी ओपी मिश्रा यांनी सांगितले की, हिंदूत्ववादी संघटनांनी महाकाल पोलीस ठाणे परिसरात असलेल्या एकलव्य हॉटेलमध्ये एका युवकाला पकडले आहे. आपली ओळख लपवत कट्टरपंथी युवकाने भाडेतत्वावर खोली घेतली होती. हिंदुत्ववादी संघटनांना संबंधित कट्टरपंथी तरुणाच्या कारवायांची माहिती होती. त्या आधारे त्यांनी हॉटेलवर धाड घातली. संबंधित तरुणाने प्रकाश कुमार गुप्ता नावाने खोली बुक केली होती. सैफ अहमद असे मूळ नाव असून तो छत्तीसगड जिल्ह्यातील भिलाई येथील रहिवासी आहे.
 
याप्रकरणातील चौकशीवेळी, सैफने बनावट कागदपत्र वापरल्याचे उघड झाले आहे. बनावट कागदपत्र हे एका रिक्षाचालकाने दिले होते. याप्रकरणात आता पोलीस रिक्षाचालकाचाही पाठलाग करत शोधमोहिम करत आहेत. दरम्यान बनावट ओळखपत्रांवर खोली का देण्यात आली? असाही सवाल त्यांनी हॉटेल व्यवस्थापनेकडे केला आहे.
 
नेते अर्जुनसिंह चौहन यांनी सांगितले की, संघटनेला आधीच माहिती मिळाली होती की, महाकाल पोलीस ठाणे परिसरात एक तरुण खोली मिळवण्यासाठी फिरत आहे. संस्थेच्या सदस्यांनी त्याचा पाठलाग करत व्हिडिओही बनवला आहे.
 
दरम्यान काही वेळानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरण उघड केले. सैफने कबूल केले की, रिक्षाचालकाने फेक अकाऊंट दिले होते. लव्ह जिहादप्रकरणी पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे.