खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंह राजकीय पक्ष स्थापन करणार

पंथ बचाओ-पंजाब बचाओ परिषदेत केली घोषणा

    05-Jan-2025
Total Views |

Khalistani Amritpal Singh
 
चंदीगड : खलिस्तानी समर्थक आणि खासदार अमृतपाल सिंह (Khalistani Amritpal Singh) हे लवकर राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. नुकतेच अमृतपाल सिंह यांना आसामच्या दिब्रुगड येथील तुरुगाच जेरबंद करण्यात आले. फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंह यांच्यासोबत ते राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत. १४ जानेवारी रोजी त्यांनी एका मेळाव्यामध्ये पंथ बचाओ-पंजाब बचाओ परिषदेमध्ये राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली, असे खालसा यांनी शनिवारीच जाहीर केले आहे. पक्षाचे नाव हे शिरोमणी अकाली दल आनंदपूर साहिब असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अमृतपाल सिंह यांचे वडील तरसेम सिंह हे पक्षाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते म्हणाले की, आम्ही माघी मेळ्यावर श्री मुक्तसर साहिब येथे एक परिषद बोलावली आहे. ज्यामध्ये एक समिती स्थापन केली जाईल. नवीन राजकीय पक्षाच्या घटनेचा मसुदा तयार करणे. त्याचे नाव निश्चित करणे, सल्लागार समिती स्थापन करणे, जिल्हानिहाय समित्या तयार केल्या जातील.
 
सरसेम सिंह म्हणाले की, अमृतपाल सिंग तुरुंगातून बाहेर आल्यावर पक्षाचे नेतृत्व करतील, तोपर्यंत ते पक्षाचे प्रमुख असतील. फरीदकोटचे खासदार सरबजीत सिंह खालसा, इंदिरा गांधींचे मारेकरी बेअंत सिंह यांचा मुलगा म्हणाले की, सुरुवातीला ते राज्यभरातील लोकांशी साधण्यासाठी पाच किंवा ११ सदस्यांची समिती तयार करतील. ते पुढे म्हणाले की, पक्ष शिरोमणी गुरुद्वार प्रबंधक समितीच्या निवडणुकीतही लढणार आहे.