भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गुजरात येथे कोसळले, अपघातात ३ जणांचा मृत्यू
05-Jan-2025
Total Views |
गांधीनगर : भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गुजरातमधील पोरबंदर येथे कोसळले असल्याची घटना दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ५ जानेवारी २०२५ रोजी घडली. या अपघातामध्ये एकूण ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघात झालेले हेलिकॉप्टर हे तटरक्षक दलाचे होते अशी माहिती सांगण्यात आली. यामध्ये तीन क्रू मेंबरचाही समावेश होता. दरम्यान मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पोरबंदर येथे हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यावेळी चार पैकी एकजण बचावला गेला असून तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणातील पुढील तापासादरम्यान हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण समोर आले आहे.
#Gujarat: A helicopter crash at Porbandar airport caused a devastating explosion.
ICG officials confirm that all three onboard, including two pilots, have lost their lives. pic.twitter.com/dMAHuS1jOp
हेलिकॉप्टरच्या टेक ऑफदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले आणि त्याचा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली होती.