भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत कुर्ला विधानसभेत 'भाजप संघटन पर्व' सदस्यता अभियान संपन्न

    05-Jan-2025
Total Views |

भाजप संघटन पर्व
 
मुंबई : 'भाजप संघटन पर्व' सदस्यता अभियानातून राज्यभरात एकूण २५ लाख नवे सदस्य जोडण्यात येणार आहेत. याचपार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेतील प्रभाग क्र. १५१ मध्ये 'भाजप संघटन पर्व' सदस्यता अभियान दिः ५ जानेवारी २०२५ रोजी पार पडले. या अभियानास भाजपचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली.
 
यावेळी भाजप नगरसेवक, भाजप जिल्हाध्यक्ष सुषमा सावंत, जिल्हा महामंत्री नितेश सिंह, विधानसभा अध्यक्ष संजय जाधव, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक राजेश फुलवारिया, जिल्हा सचिव रामस्वरूप गोयल, रवींद्र घाग, अभय परब, विधानसभा महामंत्री किरण शेवाळे, महिला मोर्चा अध्यक्षा भावना पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित असून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे. दरम्यान हजारो संख्येने भाजप सदस्यांनी आपली नोंदणी केली आहे.
 
महाराष्ट्र राज्यातून भाजप एकाच दिवसात २५ लाख नवे सदस्य जोडणार आहे. त्यापैकी कुर्ला विधानसभा मतदारसंघात अनेक सदस्यांनी उपस्थिती दर्शवून भाजपच्या संघटनेसाठी या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.