तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’साठी अभिनेता सुबोध भावे ऑनबोर्ड!
04-Jan-2025
Total Views |
मुंबई : तेजस देऊस्कर दिग्दर्शित देवमाणूस या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या एक से एक कलाकारांच्या टीम मध्ये आता अभिनेते सुबोध भावे सामील झाले आहेत. अभिनेता सुबोध भावे, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दिग्गज कलाकारांसोबत यंदा स्क्रीन शेअर करणार आहेत, त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे.
बालगंधर्व, आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या अविस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले सुबोध भावे आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत.
देवमाणूसबद्दल बोलताना म्हटले की, “मला यापूर्वी दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोघांसोबत स्वतंत्रपणे चित्रपटात काम करण्याचा बहुमान मिळाला आहे, परंतु देवमाणूसमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एकत्र काम करणे हा खरोखरच माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव आहे. या अविश्वसनीय चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि आमचे सामूहिक प्रयत्न पाहून प्रेक्षकांकढून कसा प्रतिसाद मिळतो हे सुद्धा पाहण्यासाठी मी आतुर आहे.”
देवमाणूस या चित्रपटाचे इतर तपशील जरी गुपित असले तरी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच एक प्रकारची कास्टिंगची माहिती देऊन निश्चितच या चित्रपटासाठी प्रेक्षकांची आवड निर्माण केली आहे.