प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आर.चिदंबरम काळाच्या पडद्याआड!

    04-Jan-2025
Total Views |

chidambaram

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या अणुचाचणीमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे भौतिकशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांचे निधन झाले. भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे यांनी चिदंबरम यांनी आपल्या पश्चात समृद्ध कामगिरी या देशासाठी मागे ठेवली आहे.

डॉ. राजगोपाल चिदंबरम यांनी १९७४ मध्ये भारताच्या पोखरणमधील पहिल्या आणि १९९८ मध्ये दुसऱ्या अण्वस्त्र चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून अनेक प्रतिष्ठित पदांवर काम केले आहे. डॉ. चिदंबरम यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल १९७५ मध्ये पद्मश्री आणि १९९९ मध्ये पद्मविभूषण, तसेच अनेक विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेटसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. चिदंबरम यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (२००१-२०१८), भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक (१९९०-१९९३), अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष (१९९३-२०००) अशा अनेक प्रतिष्ठित पदांवर काम केले आहे.

पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली
डॉ. राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरंजली वाहताना आपल्या भावना प्रकट केल्या. मोदी म्हणाले की चिदंबरम हे भारताच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार होते, त्यांनी भारताच्या वैज्ञानिक आणि सामरिक क्षमतांना बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.