करायाला गेलो एक! पिथमपूर इथले आंदोलक 'पेटले'

भोपाळचा विषारी कचरा पिथमपूर मधून हटवण्याची केली होती मागणी

    04-Jan-2025
Total Views |

pithampur

भोपाळ : मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात, पिथमपूर येथे विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावू नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करीत होते. अशातच यातील काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न करत स्वताच्या अंगावर तेल ओतून घेतले. एका क्षणात भडका उडाला आणि ३ आंदोलनकर्त्यांनी पेट घेतला. सुदैवाने या आंदोलनात कुठलीही जीवीतहानी झालेली नाही, भाजलेल्या आंदोलनकर्त्यांवर नजीकच्या रूगणालयात उपचार सुरू आहे.

भोपाळ गॅस दुर्घटना होऊन ४ दशकं लोटल्यावरसुद्धा विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली नाही. अखेर मध्यप्रदेशच्या उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले व लवकरात लवकर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले. पिथामपूर येथे काही वर्षांपूर्वी झालेल्या एका यशस्वी प्रयोगानंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात. १ जानेवारीच्या रात्री भोपालच्या कारखान्यातून हा विषारी कचरा पिथमपूर येथे नेण्यात आला. हा विषारी कचरा पिथमपूर न आणता परत न्यावा अशी मागणी इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी त्वरीत दाखल झाले, व जमावाला पांगवण्यासाठी लाठी चार्जचे आदेश देण्यात आले. जखमी झालेले आंदोलनकर्ते राजकुमार रघुवंशी माध्यमांशी बोलताना म्हणाले की हा कचरा आमच्या पिथामपूर मध्ये आण्ण्याच्या निषेधार्थ मी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

पिथामपूरचे एसडीएम विवेक गुर्जेर माध्यमांशी बोलताना म्हणाले की "विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येऊ नये म्हणून इथे आंदोलन केले जात आहे. मात्र, ही विल्हेवाट वैज्ञानिकपद्धतीने होणार आहे. यामध्ये नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही." कंटेनरमध्ये आणलेला हा विषारी कचरा परत नेण्याची मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.