विराट कोहलीचे चाहते आहेत नाना पाटेकर; म्हणाले, “तो लवकर बाद झाल्यास माझी भूक…”
04-Jan-2025
Total Views |
मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहलीचा कुणी या जगात चाहता नसेल असं शोधून सापडणार नाही. आपल्या विलक्षण फलंदाजीने जगाला भुरळ घालणाऱ्या विराटच्या नावे अनेक रेकॉर्ड आहेत. दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर देखील विराटचे मोठे चाहते असून तो बाद झाल्यास त्यांची काय प्रतिक्रिया असते याबद्दल नानांनी स्वत: खुलासा केला आहे.
नानांनी नुकतीच टीव्ही ९ ला मुलाखत दिली. त्यात त्यांनी आवडता क्रिकेटपटू विराट कोहली असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना नाना म्हणाले की, “विराट कोहली मला खूप आवडतो. विराट लवकर बाद झाला की माझी भूक मरते. काहीच खावेसे वाटत नाही,” सिडनीमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटीत विराट ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर आऊट झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी नाना पाटेकरांच्या या वक्तव्याचा उल्लेख करत ते आज जेवणार नाहीत, असे मीम्स बनवले होते.
दरम्यान, नाना पाटेकर नुकतेच ‘वनवास’ चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांच्याबरोबर उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, खुशबू सुंदर या कलाकारांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित झाला होता.