मुंबई, दि.४: प्रतिनिधी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने वर्ष २०२४ मध्ये कामगिरीचे नावे शिखर गाठले आहे. कंटेनर थ्रूपुटमध्ये विक्रमी ७.०५ दशलक्ष टीईयूएसचे ध्येय साध्य केले आहे. “जनेप प्राधिकरणाने २०२४मध्ये ७.०५ दशलक्ष टीईयूएस कंटेनर थ्रूपुट साध्य केले आहे. आम्ही १०पेक्षा जास्त दशलक्ष टीईयूएस हाताळण्याची क्षमता साध्य करून या महिन्यात भारताचे सर्वात मोठे बंदर बनण्यासाठी सज्ज आहोत," असा विश्वास हितधारकांच्या बैठकीत उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी व्यक्त केला.
पुढे उन्मेष वाघ म्हणाले, ही कामगिरी आमचे कर्मचारी, भागधारक आणि टर्मिनल ऑपरेटर्स यांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. सागरी क्षेत्रात जनेप प्राधिकरणाचे स्थान पुढे नेण्यासाठी त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण महत्त्वपूर्ण ठरले आहे. जसजसे आपण वाढत जात आहोत, तसतसे आम्ही परिचालन उत्कृष्टता राखण्यावर आणि भारताच्या जागतिक व्यापार नेतृत्वात योगदान देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
जनेप प्राधिकरणामधील हितधारकांच्या बैठकीत बंदर आणि लॉजिस्टिक इकोसिस्टमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध सहभागींनी एकत्र येत हे यश साजरे केले. या बैठकीला बीएमसीटी, डीपी वर्ल्ड, एपीएमटी, बीपीसीएल, एनएसएफटी, एनएसडीटी आणि जेजेएलटीपीएल या जवाहरलाल नेहरू पत्तनमधील टर्मिनल ऑपरेटर्स उपस्थित होते. एमएएनएसए, सीएसएलए, एफएफएफएआय, सीएफएसएआय, एलसीबीयूए आणि बीसीबीए सारख्या व्यापार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. अभिप्रायाची देवाणघेवाण, नाविन्यपूर्ण कल्पना सामायिक करणे आणि अखंडित प्रचालन आणि शाश्वत विकास करण्यासाठीच्या भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यासाठी एक माध्यम मंच म्हणूनही या बैठकीचा उपयोग झाला.
बंदर आपली क्षमता सदैव बळकट करत असताना, कंटेनर टर्मिनलचा विस्तार आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा यासारख्या चालू असलेल्या प्रकल्पांमुळे जागतिक व्यापारातील एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून जनेप प्राधिकरणाचे स्थान आणखी मजबूत होईल. या विकासात्मक घडामोडींमुळे, भारताच्या आर्थिक विकासात आणि सागरी नेतृत्वात आणखी योगदान देत, जनेप प्राधिकरण भविष्यात आणखी अधिक मोठ्या प्रगतीसाठी सज्ज आहे, अशी माहिती जनेप्र प्राधिकरणाने दिली आहे.
आर्थिक वर्ष २०२४-२०२५ची ठळक वैशिष्ट्येः
1. ७.०५ दशलक्ष टीईयूए आतापर्यंतचे सर्वाधिक कंटेनर थ्रूपुट हाताळले.
2. सर्वाधिक ९०.२७ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळली.
3. बीएमसीटीपीएल आणि एपीएमटीने कंटेनर हाताळणीमध्ये २ दशलक्ष टीईयूएस पार केले आणि बीएमसीटीपीएलने २.१२दशलक्ष टीईयूएस हाताळले जी एका वर्षात कोणत्याही टर्मिनलद्वारे आतापर्यंतची सर्वाधिक कंटेनर हाताळणी आहे.
4. एनएसडीटीने १.७२ दशलक्ष टन सिमेंट आणि ०.३९दशलक्ष टन ब्रेक बल्क कार्गोची विक्रमी हाताळणी.
5. एप्रिल-२०२४ ते डिसेंबर-२०२४या कालावधीत ५,३७७,४२१ टीईयूएस कंटेनर आणि ६८.३७ दशलक्ष टन माल हाताळला.
6. एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत ४,९८९ कंटेनर रॅक आणि ७,८९,८२५ टीईयूएस हाताळले.