जेएनपीए २७ एकर जागेत उभारणार कृषी प्रक्रिया केंद्र

जेएनपीए अशी सुविधा उभारणार भारतातील पहिलं बंदर

    04-Jan-2025
Total Views |

jnpa agro processing


मुंबई, दि.४ : प्रतिनिधी 
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने मेसर्स ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कन्सोर्टियम) यांना निर्यात-आयात सह देशांतर्गत कृषी कमोडिटी-आधारित प्रक्रिया आणि साठवण सुविधा उभारण्यासाठी पुरस्कार पत्र जारी केले. या प्रकल्पासाठी अंदाजे २८४ कोटी रुपये इतका खर्च येईल. हे केंद्र पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये २७ एकर जमिनीवर बांधण्यात येणार आहे.
जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ म्हणाले, "हा प्रकल्प भारताची कृषी रसद क्षमता वाढवेल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कृषी व्यापाराच्या वाढीस चालना देईल. नवीन सुविधेसह, जेएनपीए भारताची कृषी निर्यात मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नवीन वर्षात आमचा भर पायाभूत सुविधा वाढ आणि विकासाला गती देण्यावर असेल. यासोबतच महत्त्वाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर असेल."
जेएनपी बंदराद्वारे प्रदान करण्यात येत असणारी ही भारतातील पहिलीच कृषी सुविधा आहे. कृषी मालाच्या प्रक्रिया, वर्गीकरण, पॅकिंग आणि प्रयोगशाळा सुविधांसह सर्वसमावेशक सेवा प्रदान करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा आणि व्यापार नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेवर जोर देऊन आणि केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेशसारख्या इतर राज्यांच्या कृषी मालाची पूर्तता करेल. या प्रकल्पाला १६ जुलै २०२४ रोजी द्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडून मंजुरी देण्यात आली.