अविस्मरणीय अनुभव! ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट!

    04-Jan-2025
Total Views |

koneru hampi
 
नवी दिल्ली : भारतीय बुद्धिबळ महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी दुसऱ्यांदा वुमन्स रॅपीड चेस चॅम्पियनशिप जिंकली. भारतालाच नव्हे तर सबंध जगाला हेवा वाटावा अशी कामगिरी हम्पी यांनी केली आहे. अशातच आता हंपी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी हंपी यांची प्रशंसा करत, त्यांच्या खेळाचे कौतुक केले.

पंतप्रधान मोदींशी बोलताना कोनरू हंपी म्हणाल्या की पंतप्रधनांची भेट अविसमरणीय होती. भेटीचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी होता. या भेटीवर भाष्य करताना मोदी म्हणाले कोनेरू हम्पी आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. हंपी म्हणजे महत्वाकांक्षी खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांनी केवळ भारताचीच मान गौरवाने उंचावली नसून उत्कृष्टतेची व्याख्या सुद्धा बदलली आहे. मागच्या आठड्यात जग्गजेता ठरलेल्या डी गुकेशची भेट पंतप्रधनांनी घेतली. गुकेशच्या आत्मविश्वासाचे आणि जिद्दीचे पंतप्रधनांनी कौतुक केले. माध्यमांशी बोलताना हंपी म्हणाल्या की "भारताच्या चेससाठी हा सुवर्णकाळ आहे"