'आक्रांतांची नावे मुलांना ठेवणे...'; कुमार विश्वास यांचा सैफ-करीनाला इशारा?

    04-Jan-2025
Total Views |

kumar vishwas 
 
 
मुंबई : कवी कुमार विश्वास त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा आणि तिचा नवरा झहीर इक्बालवरील त्यांचं वक्तव्य चर्चेत असताना आता त्यांनी मुरादाबामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात नाव न घेता करिना कपूर-खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवण्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
 
एका कार्यक्रमात कुमार विश्वास यांनी कुणाचंही नाव न घेता करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर निशाणा साधला आहे. कुमार म्हणालेकी, “मला माहिती आहे की लोकं इथं माझं वक्तव्य रेकॉर्ड करायला बसले आहेत. पण, मायानगरीत राहणाऱ्यांना देशाला काय हवंय हे समजलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे”.
 
 
 
ते पुढे म्हणाले की, “आता हे चालणार नाही. आमच्या जीवावर लोकप्रिय होणार. आम्ही तिकीटं खरेदी करणार. हिरो आम्ही करणार. हिरोईन आम्ही करणार आणि तुमच्या तिसऱ्या लग्नानंतर जे मुल होईल त्याला तुम्ही बाहेरुन आलेल्या आक्रमकाचं नाव देणार. हे चालणार नाही. किती नावं आहेत. रिझवान, उस्मान किंवा अजून काहीही नाव ठेवता आलं असतं. पण तुम्हाला एकच नाव मिळालं?”
कुमार विश्वास इथंच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, 'ज्या लंगड्या माणसानं आपल्या देशात येऊन येथील आई-बहिणींवर बलात्कार केले तो लफंगाच तुम्हाला या गोड बाळाचं नाव ठेवताना आठवला का? तुम्ही त्याला हिरो बनवणार असाल तर आम्ही त्याला खलनायक देखील होऊ देणार नाहीत, लक्षात ठेवा.”