सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारतच - एन चंद्रशेखर

विकासाची गती थोडी धीमी राहीली तरी फरक पडणार नाही

    04-Jan-2025
Total Views |
 
 
ोस
 
 
 
 
मुंबई : विकासाची गती थोडी धीमी राहीली तरी भारतच जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील असा विश्वास टाटा समुहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. जगातील वाढती अपारंपारिक ऊर्जेची मागणी, कृत्रिम बुध्दिमत्तेचा वाढता वापर, जागतिक पुरवठा साखळीत होणारे बदल हे पुढील काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कायम राखतील. चेन्नईच्या एनआयटी त्रिचीच्या माजी विद्यार्थी संमेलनात चंद्रशेखर बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्था मंदावल्यासारखी दिसत जरी असली तरी ही स्थिती तात्पुरती असून लवकरच ती बदलेल असे त्यांनी सांगितले.
 
 
२०२५ हे वर्ष कृत्रिम बुध्दीमत्तेचे म्हणजे एआयचे असून जगातील सर्वच प्रमुख अर्थव्यवस्था त्यात गुंतवणुक करत आहेत. त्यामुळे येणारा काळ हा एआयचा आहे. त्यामुळे भारतीय उद्योगांनीही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. चीनी अर्थव्यवस्थेची घसरण ही सुध्दा भारतासाठी एक इष्टापत्तीच असून भारतीय उद्योग क्षेत्राने त्याचा फायदा उठवला पाहिजे. येत्या काळात चीनचा जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा हा ३० टक्क्यांवरुन २५ टक्क्यांवर घसरणार आहे. त्यामुळे भारतासाठी ही मोठी संधी आहे.
 
 
देशांतर्गत पातळीवर सरकारकडून होत असलेला पायाभूत सुविधांवरचा खर्च देशाच्या प्रगतीस पूरक ठरणार आहे. भारतीय सरकारकडून डिजीटायजेशनला दिले जाणारे प्रोत्साहन, अपारंपारिक ऊर्जेचा वाढता वापर, जागतिक पुरवठा साखळीत सुधारणांचे इंडिया प्लस मॉडेल यांमुळेही भारताला मोठा फायदा होणार आहे. भारतीय उद्योग क्षेत्राने या सर्व गोष्टींचा फायदा उचलावा असे प्रतिपादन चंद्रशेखर यांनी केले.