मुंबई : अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. मैत्रीवर आधारित या चित्रपटाची ओढ १२ वर्षांनी देखील तितकीच किंबहुना त्याहून जरा अधिकच आहे याची प्रचिती नुकतीच आली. सध्या जुन्या गाजलेल्या चित्रपटांना पुन:प्रदर्शित करण्याचा ट्रेण्ड सुरु असून यात रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असणारा 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपटही ३ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटगृहात प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी तुफान गर्दी तर केलीच पण चित्रपटातील बत्तमीज दिल या गाण्यावर प्रेक्षक थिरकताना दिसले. चित्रपटगृहातील प्रेक्षक आनंदाने नृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.
'ये जवानी है दिवानी'चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 'बत्तमीज दिल' गाण्यावर प्रेक्षक कल्ला करताना दिसत आहेत. १२ वर्षांनी पुन्हा 'ये जवानी है दिवानी' प्रदर्शित झाल्यावर पुन्हा प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली आहे.
२०२५ च्या सुरुवातीलाच 'ये जवानी है दिवानी' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटी २५ लाखांची कमाई केली आहे. पुन्हा एकदा बनी, नैना आणि त्याच्या मित्रांची धमाल पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. 'ये जवानी है दिवानी' मध्ये रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, कल्की कोएचलीन, आदित्य रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.