पर्यटक असल्याचे सांगत बांगलादेशी नागिरकांची भारतात घुसखोरी, ५ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    04-Jan-2025
Total Views |
 
Bangladeshi
 
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे बांगलादेशी (Bangladeshi) नागिरकांनी पर्यटक असल्याचे सांगत घुसखोरी केली आहे. व्हिसा संपल्यानंतरही ते भारतात अनेक दिवसांपासून वास्तव्य करत होते. यामध्ये महिलांचाही यामध्ये समावेश आहे. त्यांच्या कारवाईनंतर त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी ३ जानेवारी २०२५ रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, शुक्रवारी दिल्ली पोलीस डीलीपी रवी कुमार यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, बांगलादेशी आणि इतर काही घसखोरांची ओळख पटवण्यासाटी पोलिसांना स्वतंत्र्य एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाच्या निगराणीवेळी सरिता विहाल परिसरामधील मदनपूर खादर विभागातील मावसी गेस्ट हाऊस येथे काही घुसखोरी करणारे बांगलादेशी वास्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे.
 
घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी पर्यटकांच्या व्हिसाची मुदत ही ऑगस्ट २०२४ मध्येच संपली होती. त्यावेळी पोलिसांनी गेस्ट हाऊसच्या मालकावरही गुन्हा नोंदवला आहे. गेस्ट हाऊसच्या मालकानवने पाच बांगलादेशी घुसखोरी करणाऱ्यांना खोली भाडेतत्त्वार देण्याआधी संबंधित कागदपत्रांनी पडताळणी केली नाही.
 
महत्त्वाची बाब म्हणजे गुरूवारी पोलिसांनी दक्षिण पश्चिम जिल्ह्यात शोधमोहिस सुरू आहे. त्यानंतर पोलिसांनी २०१३ पासून भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली होती. ५४ वर्षीय लियाकत आणि ३९ वर्षीय नसरीन अशी त्याची नावे आहेत. लियाकत आणि नसरीन पत्नी-पत्नीच्या नात्यात आहेत.
 
दरम्यान आता दिल्ली पोलिसांनी इतर काही भागांमध्ये घुसखोरांवर कारवाई केली आहे. या घुसखोरांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचे नाव लवली खातून इस्लाम असे त्याचे नाव आहे. दिल्लीच्या वसंत कुंज परिसरात एका बांगलादेशीलाही अटक करण्यात आली आहे. मोहम्मद बबलू असे नाव असून तो ढाका येथील डेमरा गावातील रहिवासी आहे.