चोरीचा आक्षेप घेतल्याने हिंदू युवकाची कट्टरपंथींनी रेल्वेमध्येच केली हत्या
04-Jan-2025
Total Views |
हैदराबाद : हैदराबाद-दिल्ली दक्षिण रेल्वे मार्गात प्रवास करत असताना एका हिंदू युवकाने चोरी करणाऱ्या युवकावर चोरीचा आक्षेप घेतल्याने त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना गुरूवारी २ जानेवारी २०२५ या नुतनवर्षात घडली आहे. पीडित युवकाचे नाव हे शशांक रामसिंह राज असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील आहे.
शशांक सिकंदराबादहून झाशीला जात होता. त्यावेळी तो ट्रेनच्या जनरल डब्याच्या शौचालयानजीक असताना चार जणांनी त्याच्या खिशातून १७०० रूपये चोरले. चोरी करणारे आरोपी हे मोहम्मद फय्याज, हाशिमुद्दीन, सय्यद समीर सय्यद जिमल, एम श्याम कोटेश्वर राव आणि मोहम्मद अमाम मोहम्मद अकबर आहेत. हे सर्वजण हैदराबाद येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
एका सहप्रवाशाचा मोबाईल चोरतेवेळी शशांकने हा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यावेळी त्याने त्या चोरट्यांचा सामना केला. त्याचवेळी त्याच्या लक्षात आले की आपले १७०० रूपये गहाळ झाले आहे. पीडित आणि चार आरोपींमध्ये बाचाबाची झाली. नंतर शशांकला बेदम मारहाण करण्यात आली तेव्हा त्याला उलट्या झाल्या होत्या आणि तो जागीच बेशुद्ध पडला.
दरम्यान नागपूर रेल्वेस्थानकारवर रेल्वे विभागातील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला मृत्य घोषित केले. इतर प्रवाशांनी दोन आरोपींना पकडल्यास उर्वरिच दोघेजण रेल्वेमध्ये लपले होते. या चौघांना रेल्वे पोलिसांनी नागपुरातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.