मोहम्मद मुजाहिब शेखने केला युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न

    04-Jan-2025
Total Views |
 
अपहरण
 
पटना : एका अल्पवयीन हिंदू युवतीवर दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी एकाला ताब्यात घेतले आहे. बिहारमधील गया शहरातील दुल्हिंगाज येथे ही घटना घडली आहे. आरोपीचे नाव हे मोहम्मद मुजाहिब शेख असे आहे. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी एका अल्पवयीन ८ वर्षीय चिमुरडीचे अपहरण केले.
 
कट्टरपंथी मोहम्मदने अल्पवयीन युवतीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी एकाने पीडितेला मोहम्मद मुजाहिब शेखकडून पीडितेची सुटका केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाली असता ते सावध झाले. यामुळे पीडितेला मोहम्मदच्या ताब्यातून सुटका करण्यास यश आले.
 
 
 
स्थानिकांनी आरोपीला बेदम मारहाण करत गया पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आता मोहम्मद मुसाहिब शेख याच्याविरोधात प्रथम माहिती अहवालात तक्रार नोंद करण्यात आली. आरोपी हा राजस्थानमधील जयपूर शहरातील रहिवासी आहे.
 
तक्रार दाखल करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. घटनास्थळी कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आणि परिसरामध्ये रहिवाशांनी आपल्या सुरक्षेत वाढ व्हावी अशी मागणी केली आहे.