दादरमधील प्रसिद्ध हरीभाऊ विश्वनाथ संस्था साजरा करणार शताब्दी महोत्सव

    04-Jan-2025
Total Views |


image 
 
मुंबई : ‘वाद्य निर्मिती आणि वाद्य विक्री’ या क्षेत्रांत शंभरी पूर्ण करणाऱ्या ‘हरीभाऊ विश्वनाथ ग्रुप ऑफ म्यूझिकल इंडस्ट्रीज’ या संस्थेचा शताब्दी महोत्सवी सोहळा रविवार ५ जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात सायंकाळी ५:३० वाजता साजरा होणार आहे.
 
या सोहळ्याला प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की व कौशल इनामदार उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राहुल शर्मा यांचे संतूर वादन, आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू यांची हार्मोनियम जुगलबंदी, नीलेश परब आणि प्रभाकर मुसळे यांचे ढोलकी वादन होणार आहे. या सोहळ्याच्या प्रवेशिका ‘हरीभाऊ विश्वनाथ ग्रुप ऑफ म्यूझिकल इंडस्ट्रीज’ या संस्थेच्या दादर, प्रभादेवी आणि गिरगाव येथील शाखांमध्ये उपलब्ध आहेत.
 
‘हरीभाऊ विश्वनाथ ग्रुप ऑफ म्यूझिकल इंडस्ट्रीज’ ही संस्था १९२५ साली हरिभाऊ दिवाणे यांनी स्थापन केली. स्वत: हार्मोनिअम वादक असणाऱ्या हरिभाऊ यांनी हार्मोनिअम दुरुस्ती आणि विक्री करणाऱ्या या संस्थेची सुरुवात दादरमध्ये एका छोट्याशा पत्र्याच्या शेड मध्ये केली. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या संस्थेतून वाद्ये खरेदी केली आहेत आणि ती परंपरा आजही सुरू आहे.