मंदिरात पूजा सुरू असताना काँग्रेस नेत्याने आणला व्यत्यय
04-Jan-2025
Total Views |
रायपुर : छत्तीसगड येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नासिर अली यांना बागीचा पोलिसांनी धार्मिक तणाव निर्माण केल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना ३ जानेवारी २०२४ रोजी घडली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेते नासिर अली यांच्याविरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आरोपीविरोधात केलेल्या तक्रारीनुसार, ३ जानेवारी रोजी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान पुजारी मंदिरात देवीची पूजाअर्चा करत होते. यावेळी बगीचा येथील रौनी रोड येथे राहणारा आरोपी नासिर अली हा मंदिरात आला आणि त्याने पूजा सुरू असताना व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला आहे.
मंदिरातील उपस्थित असलेल्या भाविकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. पुजारी भूपेंद्र पाठक यांनी आरोप केला की, आरोपीने लाऊड स्पीकर बंद करत प्रार्थना करतेवेळी व्यत्यय आणला. यामुळे धार्मिक तणाव वाढला आहे.
या तक्रारीवरून बागीचा पोलिसांनी नासिर अलीविरोधात कलम १९६ (२) आणि २९९ नुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.