मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट!

    04-Jan-2025
Total Views |
 
Bawankule
 
नवी दिल्ली : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, ४ डिसेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिर्डी येथे होणाऱ्या भाजपच्या महाअधिवेशनाची त्यांना माहिती घेतली. बावनकुळे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.
 
 
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांची भेट नेहमीच ऊर्जा देणारी, मार्गदर्शक असते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला आशीर्वाद देताना मोलाच्या सूचनाही केल्या. जनता, प्रशासन आणि सरकार यांच्यातील समन्वय महत्वाचा असून लोककल्याणकारी राज्य अशी प्रतिमा असावी अशी सूचना त्यांनी केली. राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबद्दल कौतुक केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच येत्या १२ जानेवारीला शिर्डी येथे होणाऱ्या महाअधिवेशनाची माहितीही त्यांनी अमित शाह यांना दिली.
 
हे वाचलंत का? -  चला एकत्र येऊन राष्ट्र घडवूया! राज्यभरात भाजपचे प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान
 
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शाह यांना कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे काष्ठशिल्प भेट देवून आईच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी निमंत्रणाचा आनंदाने स्वीकार केला आणि लवकरच दर्शनाला येण्याचे आश्वासन दिल्याचेही बावनकुळेंनी सांगितले.