मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा वर्षभरापासू सुरु होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच आराध्याच्या शाळेत एका कार्यक्रमादरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसल्यानंतर या सर्व चर्चांना पुर्णविराम लागला. परंतु, या मधल्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेक ग्रे डिव्हॉर्स घेणार आहेत, वेगळे राहात आहेत अशा असंख्य गोष्टी बोलल्या गेल्या. मात्र, आता २०२५ या नव्या वर्षात आराध्या, अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले आहेत. शिवाय यावेळी ऐश्वर्याने मराठीत असं काही म्हटलं आहे की सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
अभिषेक बच्चन आणि
ऐश्वर्या राय लेक आराध्याबरोबर नवीन वर्षानिमित्त परदेशात गेले होते. ते परदेशातून परतल्यावर मुंबई विमानतळावर पापाराझींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी ऐश्वर्या तिचं सामान घेऊन मराठीत ‘चला चला’ म्हणताना दिसली. तिचं ते मराठीतील म्हटलेलं चला-चला सध्या लोकांचं चांगलंच लक्ष वेधत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंट्स करत असून या दोघांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यामुळे एकत्र आता आराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेकला पाहिल्यानंतर लोकांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आता तरी आळा बसला असे दिसत आहे.