पत्रकार मुकेश चंद्रकारची हत्या करणाऱ्या कंत्राटदारावर प्रशासनाचा बुलडोझर पॅटर्न
04-Jan-2025
Total Views |
रायपुर : छत्तीसगडमधील विजापूर येथील पत्रकार मुकेश चंद्रकार हत्या प्रकरणात प्रशासनाने आरोपीवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आरोपी काँग्रेस नेता आणि कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. प्रशासनाने बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास सुरूवात केली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. तसेच आरोपीची तीन बँक खाती गोठवली गेली आहेत.
मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह ३ जानेवारी रोजी सेप्टिक टँकमध्ये सापडला होता. मुकेश हा १ जानेवारीपासून बेपत्ता होता असे तापासातून समोर आले आहे. मुकेशच्या अंगावरील कपड्याच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. १ जानेवारी रोजी सुरेश चंद्राकर यांचा भाऊ रितेश याने मुकेशला काही कामासाठी फोन केला असता त्यानंतर त्याचा फोन बंद झाल्याचे सांगितले.
दरम्यान, बस्तरमधील कंत्राटदराच्या वर्चस्वामुळे पत्रकारांना अनेकदा धमक्याही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित घटनास्थळी तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुकेशच्या या हत्येमुळे पत्रकार आणि कंत्राटदारांमधील वाद हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.