रिअॅलिटी शोमधील मोठा घोटाळा उघडकीस : विजेत्याची लबाडी उघड, सत्य समोर येताच निर्माते थक्क!
31-Jan-2025
Total Views |
न्यू यॉर्क : प्रसिद्ध रिॲलिटी शो 'व्हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनीयर' मध्ये स्पर्धक चार्ल्स इंग्रॅमने ९ सप्टेंबर २००१ मध्ये सहभाग घेतला. फास्टेस्ट फिंगर फस्ट ची पहिली फेरी जिंकून हॉट सीट वर बसला.
इंग्रॅमने शोमध्ये एक मिलियन पौंड जिंकले असले तरी निर्मात्यांना लगेचच काहीतरी संशयास्पद वाटले.
पहिल्या दिवशी इंग्रॅम केवळ ४००० पौंडपर्यंत पोहोचला होता आणि दोन लाइफलाइन्सचा वापर आधीच केला होता. दुसऱ्या दिवशी तो परतला तेव्हा त्याने प्रत्येक प्रश्नावर बराच वेळ घेतला, प्रत्येक पर्याय पुन्हा पुन्हा वाचला आणि याच दरम्यान प्रेक्षकांतून खोकल्याचा आवाज येत राहिला. शेवटच्या मिलियन-पौंड प्रश्नावर, "एका संख्येनंतर शंभर शून्य लावल्यास त्याला काय म्हणतात?" यावर त्याने "नॅनोमोल" हा पर्याय विचारात घेतल होता पण नंतर पर्याय बदलून बरोबर उत्तर "गुगोल" निवडले.
निर्मात्यांनी इंग्रॅमच्या विजयावर जल्लोष केला, परंतु त्याच्या खेळावर संशय आल्याने त्यांनी फुटेजची पुन्हा तपासणी केली. त्यात प्रेक्षकांतून इंग्रॅमने बरोबर उत्तर सांगण्याअगोदर खोकल्याचे आवाज ऐकू येत होते. ब्रिटीश टेलिव्हीजन चे निर्माता पॉल स्मिथ यांनी सांगितले, "गेल्या सोमवारीच्या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर आणि टेप्स काळजीपूर्वक तपासल्यानंतर, आम्हाला काही अनियमितता आढळल्या आहेत." या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून कार्यक्रम प्रसारित होणार नाही आणि चेकच्या रकमेला मान्यता दिली जाणार नाही, असेही सांगण्यात आले. यानंतर इंग्रॅमला फोन करून सांगण्यात आले की, त्याला बक्षीसाची रक्कम मिळणार नाही.
इंग्रॅमने या आरोपांना साफ नकार दिला आणि हा आरोप खोटा कार्यक्रमाचे निर्माते माझ्यावर फसवणूकीचा खोटा आळ घालत आहेत. यावर निर्माता पॉल स्मिथ यांनी स्पष्ट केले की, "तुम्ही आमच्यावर फसवणुकीचा आरोप करीत आहात. जर मी तुमच्या जागी असतो तर मी नक्कीच वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिली असती."या प्रकरणामुळे ' 'व्हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनीयर' शोवरील हा सर्वात मोठा घोटाळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.