महाविद्यालयात सरस्वतीचे पूजन केल्यास बलात्कार करेन, तृणमूल काँग्रेस नेत्याची विद्यार्थ्यांना धमकी

    31-Jan-2025
Total Views |
 
Trinamool Congress
 
कोलकाता : प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये जोगेश चंद्र चौधरी लॉ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका कट्टरपंथी नेत्याने सरस्वतीचे पूजन करण्यासाठी विरोध केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते मोहम्मद शब्बीर अली हे तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे सरचिटणीस आहेत. त्यांनी सरकारी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पूजा करण्याचे धाडस केल्यास बलात्कार करत खून करेन अशी धमकी दिली आहे या प्रकरणी आता चारूमाला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
या प्रकरणानंतर पोलिसांकडे तक्रार केलीच मात्र त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज रॉय यांच्याकडेही तक्रार दाखल केली. त्यांनी तृणमूलचे नेते मोहम्मद शाब्बीर अलीवर अनेक आरोप केले.
 
या प्रकरणी आता एका विद्यार्थ्याने माहिती दिली की, बबाहेरील लोक खंडणी मागतात. ते आम्हाला सरस्वतीची पूजा करू देत नाहीत. त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आहे. आम्हाला मारहाणही केली आहे. तसेच बलात्काराची धमकी दिली असल्याचे सांगितले.
 
 
 
याच महाविद्यालयातील दुसऱ्या विद्यार्थ्याने दुःख व्यक्त करत सांगितले की, आम्हाला पूजा आयोजित करण्याचा अधिकार आहे. आम्हाला पूजा करण्यापासून ते विरोद का करत आहेत? जर सरस्वती मातेची पूजा केल्यास आम्हाला मारतील पैसे उकतील, अशी व्यथा व्यक्त करण्यात आली होती.
 
महाविद्यालयाच्या आवारामध्ये तृणमूल काँग्रेसचे मवाली गोंधळ घालत आहेत. यामुळे महाविद्यालयात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला महाविद्यालयामध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही. यामुळे आता महाविद्यालयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राचार्यही संबंधित महाविद्यालयामध्ये जाण्यास घाबरत आहेत.