सोनिया गांधींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंवर केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पलटवार
31-Jan-2025
Total Views |
नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुअर असा उल्लेख करत अवमान केला आहे. शुक्रवारी ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रसारमाध्यमाशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. अर्थसंकल्पीय अभिभाषणावरून त्यांनी राष्ट्रपतींचा अवमान केला. त्यावरून आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधींना आरसा दाखवला आहे. भाजपचे अनेक नेते काँग्रेस आणि सोनिया गांधींनी केलेल्या वक्तव्यावर संतापले आहेत.
याचपार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची आदिवाशी पार्श्वभूमी असून त्या ओडिया मातृभाषिक असल्याचे अधोरेखित झाले असल्याचे ते म्हणाले. त्यांनी संसदेमध्ये केलेल्या प्रेरणादायी भाषणाचे कौतुक केले. तसेच त्यांनी काँग्रेस नेत्यांनी अवमान केल्याने त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
PM @narendramodi ji exposes Anti Tribal mindset, Anti Women mindset of Rahul Gandhi Sonia Gandhi & Vadra family!
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) January 31, 2025
नरेंद्र मोदी म्हणाले की, "काँग्रेसच्या राजघरण्यातील एका सदस्याने एका आदिवासी महिलेचे भाषण कंटाळवाणे वाटत असल्याचे भाष्य केले. त्यामुळे त्यांच्या भाषणाला नाकारण्यात आले. दुसऱ्याने राष्ट्रपतींना गरीब असे संबोधले आहे. त्यांना त्यांचे भाषण केवळ आदिवासी असल्याने कंटाळवाणे वाटले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे देशातील १० कोटी आदिवासी बंधू आणि भगिनींचा अवमान केल्यासारखेच आहे,"असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, "शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा देत असतात. नकारात्मकता पसवण्याचे काम करत असतात. दिल्लीने साद राहावे. हे दोन्ही अहंकारीक नेते पराभवाच्या भीतीने एकत्र आले आहे," असे म्हणत त्यांनी सोनिया गांधी आणि काँग्रेसचे कान धरले आहेत.