पुणे : महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर असताना उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के बसत आहेत. आता पुण्यातील माजी आमदार महादेव बाबर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतसुद्धा उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत पुण्यातील काही नगरसेवकांचादेखील प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर बोट ठेवत गेल्या काही दिवसांत अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणूकीत तिकीट न मिळाल्याने महादेव बाबर नाराज असल्याची चर्चा होती. याच नाराजीतून आता ते उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार असल्याचे कळते.